Manasvi Choudhary
मुंबई हे विविधतेने नटलेलं लोकप्रिय ठिकाण आहे. मुंबईतील काही प्रसिद्ध ठिकाणे संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे.
मुंबईत भेट देण्यासाठी येणारे पर्यटक, मरीन ड्राइव्ह, फॅशन स्ट्रीट, गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणांना नक्की भेट देतात.
मुंबईतील फॅशन स्ट्रीट मार्केट हे प्रसिद्ध ठिकाण आहे. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत महिला व पुरूषांचे येथे ट्रेंडी कपड्याचं कलेक्शन पाहायला मिळते.
सीएसटी स्टेशनजवळ असलेल्या या मार्केटमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी असते.
फॅशन स्ट्रीट हे तरुणाईमध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि अनेक पर्यटकही येथे खरेदीसाठी येतात. तरुणाईमध्ये खूप क्रेझ आहे कारण येथे सर्व प्रकारचे ट्रेंडिंग कपडे आणि वस्तू मिळतात.
मुंबईची ओळख आणि पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या फॅशन स्ट्रीट मार्केटमध्ये तुम्हाला कमी किंमतीत शॉपिंग करता येईल.