Mumbai Tourism : गर्दी नाही, गोंधळ नाही; 'येथे' लपलाय अथांग समुद्रकिनारा, जणू मुंबईतला स्वर्गच

Shreya Maskar

मुंबई- मालाड

मुंबईतील मालाड (पश्चिम) येथे 'दाना पाणी बीच' हा सुंदर किनारा वसलेला आहे. हा किनारा 'अक्सा बीच' जवळ आहे. वीकेंडला येथे नक्की भेट द्या.

Mumbai – Malad | pinterest

दाना पाणी बीच

दाना पाणी बीचवर प्रामुख्याने काळी आणि खडकाळ कातळेपाहायला मिळतात. खडकांच्या रचनेमध्ये आणि खाचखळग्यांमध्ये नैसर्गिकरित्या वाळलेले शंख, शिंपले आढळतात.

Dana Pani Beach | pinterest

समुद्राचा नजरा

दाना पाणी बीचवर फिरण्यासाठी मरीन ड्राईव्हसारखी बसण्याची सिमेंट-दगडाची भिंत बनवण्यात आली आहे, जिथून समुद्राचा नजरा पाहता येतो.

Scenic Sea Views | pinterest

सुंदर सूर्यास्त

दाना पाणी बीचवर संध्याकाळी सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. येथे शांत फेरफटका मारण्यासाठी, विरंगुळ्यासाठी, फॅमिली पिकनिकसाठी जा.

Beautiful Sunsets | pinterest

फोटोशूट

तुम्हाला मुंबईत समुद्रकिनारी फोटोशूट करायचे असले तर येथे नक्की जा, कारण येथे गर्दी कमी असते, ज्यामुळे सुंदर फोटोज् क्लिक करता येतात.

Photoshoots | pinterest

जवळचे स्टेशन

मुंबईतील मालाड पश्चिम भागात, 'मध आयलंड' जवळ असलेल्या 'एरंगल' गावात वसलेल्या 'दाना पाणी बीच'वर पोहोचण्यासाठी तुम्ही रस्तेमार्ग किंवा फेरीचा मार्ग निवडू शकता.

Nearest Station | google

बीचवर कसं जाल?

मालाड स्थानकापासून सुमारे ८ किलोमीटर अंतरावर 'दाना पाणी बीच' आहे. त्यामुळे तुम्ही रिक्षा किंवा टॅक्सीने पोहचाल. अथवा वर्सोवा येथून 'मध जेटी'पर्यंत फेरीने प्रवास करून, त्यानंतर रिक्षाने थोडासा प्रवास करूनही बीचवर पोहचता येते.

How to Get to the Beach? | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

beach | google

NEXT : आकाशाला भिडणाऱ्या पायऱ्यांचा थरार, नाशिकमधील 'या' किल्ल्याची भव्यता पाहून हृदयाचा ठोका चुकेल

Fort In Nashik | saam tv
येथे क्लिक करा...