ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
रोजच्या धावपळीच्या जीवनातून ब्रेक घेऊन शांत वेळ घालवायचा आहे, मग मुंबईतल्या या पार्कला भेट द्या.
मुंबईच्या या पार्कमध्ये तुम्ही निसर्गाच्या सौंदर्यासह शांत वातावरणाचा आनंद घेऊ शकता.
जर तुम्ही वनडे पिकनिकचा प्लान करत असाल तर तुम्ही येथे कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत चांगला वेळ घालवू शकता.
संजय गांधी नॅशनल पार्कला बोरिवली नॅशनल पार्क या नावाने देखील ओळखले जाते. येथे जाण्यासाठी तुम्हाला तिकीट काढावे लागेल.
कैफी आजमी पार्क जुहूमध्ये स्थित आहे. येथील नैसर्गिक सौंदर्य आणि शांत वातावरण तुमच्या मनाला भुरळ घालेल.
स्वर्गाहूनी सुंदर मलाबार हिल एलिवेटेड नेचर ट्रेलला भेट द्यायला विसरु नका. फक्त २५ रुपयांमध्ये तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवू शकता.
प्रियदर्शिनी पार्क मलाबारमध्ये आहे. हा पार्क ३० वर्षे जुना आहे. येथे अनेक लोक जॉगिंगसाठी, खेळण्यासाठी किंवा शांत वेळ घालवण्यासाठी येतात.