ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गाजर, हळद, मीठ, मोहरी, मेथीचे दाणे, जीरे बडिशेप, लाल मिरची पावडर,आमचूर पावडर, आणि तेल
सर्वप्रथम, गाजर चांगले धुवा, सोलून घ्या आणि त्याचे लहान तुकडे करा.
गाजराचे तुकडे एका डब्यात काढा, त्यात एक चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घाला आणि मिक्स करा.
एका पॅनमध्ये, एक चमचा मोहरी आणि मेथीचे दाणे आणि दोन चमचे जिरे आणि बडीशेप घाला आणि भाजून घ्या.आणि मिक्सरमध्ये बारीक करा.
बारीक केलेला मसाला गाजरांना लावून ठेवा.यानंतर, गाजरांवर लाल मिरची आणि आमचूर पावडर घाला आणि काचेच्या डब्यात ठेवा.
आता,तेल चांगले गरम करुन आणि थंड होऊ द्या. मग हे तेल लोणच्यावर ओता आणि चांगले मिक्स करुन झाकणाने झाकून ठेवा.
चटपटीत गाजराचे लोणचं तयार आहे. डाळभात किंवा चपातीसोबत याचा आस्वाद घ्या.