ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिंदू धर्मात असे अनेक ग्रंथ आहेत जे आपल्या जीवनाशी संबंधित प्रश्न सोडवण्यास मदत करतात.
यापैकी एक ग्रंथ गरुण पुराण आहे. जे आपल्याला मृत्यूनंतर घडणाऱ्या घटनांबद्दल सांगतं. यामध्ये प्रत्येक गुन्ह्यासाठी वेगवेगळ्या शिक्षा आहेत.
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की,गरुड पुराणानुसार खोटं बोलणाऱ्यांना कोणत्या नरकात शिक्षा दिली जाते.
गरुड पुराणानुसार, खोटं बोलणाऱ्या लोकांना तप्तकुंभनावाच्या नरकात शिक्षा दिली जाते जिथे त्यांना अनेक यातना सहन कराव्या लागतात.
या नरकात आत्म्यांना तीक्ष्ण खिळ्यांनी छळले जाते आणि गरम लोखंडी सळ्यांवर जाळले जाते.
याशिवाय गरुड पुराणात नरक आणि वेगवेगळ्या कर्मांसाठी मिळणाऱ्या शिक्षेचा उल्लेख आहे.
रौरव नरक हा सर्वात भयानक आणि वेदनादायक मानला जातो. यामध्ये आगीत जाळण्याचा आणि प्राण्यांच्या खाल्ल्याचा उल्लेख आहे.