Manasvi Choudhary
उन्हाळ्यात उष्णता वाढल्यामुळे केवळ आरोग्यावर परिणाम होत नाही तर त्वचा आणि केसांवर देखील परिणाम होतो.
उन्हाळ्यात घामामुळे चेहरा चिपचिपा होतो यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स, मुरूमे, काळे डाग यासारख्या समस्या होतात. यावर उपाय म्हणून तुम्ही घरगुती काही टिप्सचा वापर करू शकता.
अनेकदा महिला पार्लरमध्ये जाऊन त्वचेवर केमिकलयुक्त प्रोडक्टस वापरतात यामुळे त्वचा आणखी खराब होते.
तुमचीही त्वचा घामामुळे तेलकट होत असेल तर तुम्ही मुलतानी माती आणि काकडी याचा फेसपॅक लावू शकता यामुळे त्वचा थंड राहते.
चंदन आणि दही फेसपॅक चेहऱ्यावर लावल्याने तेलकटपणा कमी होतो व त्वचा मऊ मुलायम होण्यास मदत होते.
वरील दोन सोपे उपाय केल्याने तेलकट त्वचेच्या समस्या कमी होण्यास मदत होते. आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही हा फेसपॅक लावल्याने चेहरा थंड आणि चमकदार होतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.