Shreya Maskar
मुल्हेर किल्ला महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील बागलाण परिसरात मुल्हेर गावाजवळ आहे. मुल्हेर किल्ला एक गिरीदुर्ग (डोंगरी किल्ला) आहे.
मुल्हेर आणि साल्हेर किल्ले एकमेकांच्या जवळ आहेत. हे सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेले आहेत. ऐतिहासिकदृष्ट्या किल्ल्याला मोठे महत्व आहे.
मुल्हेर किल्ल्यावर मंदिरे आणि ऐतिहासिक अवशेष आहेत. मुल्हेर किल्ल्यावर सोमेश्वर मंदिर आहे. हे मंदिर किल्ल्याच्या माचीवर असून, ते घनदाट जंगलात आहे.
मुल्हेर किल्ल्यावर ट्रेकिंग करता येते. हा ट्रेक कठीण मानला जातो. त्यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी येणे टाळा आणि हिवाळ्यात आवर्जून येथे जा.
मुल्हेर किल्ला शाहजहान बादशहाच्या काळात बागुल वंशाच्या ताब्यात होता. या किल्ल्याला बागलाणचा किल्ला असेही म्हणतात.
मुल्हेर किल्ला हा प्राचीन किल्ला आहे. लहान मुलांना येथे मजा मस्ती करता येईल. येथील परिसर आणि निसर्ग सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.