Diabetes & Cholesterol : डायबिटीज अन् कोलेस्ट्रॉलची चिंता सतावतेय? रोज सकाळी रिकाम्या पोटी खा 'हे' चमत्कारी पान

Shreya Maskar

हेल्दी पानं

तुतीची पानेही अनेक पोषक आणि जैविक सक्रिय घटकांनी समृद्ध असतात. इंग्रजीमध्ये यांना Mulberry Leaves असे म्हणतात. तर हिंदी भाषेत शहतूत किंवा सहतूत पत्ते असे म्हणतात.

Healthy Leaves | pinterest

तुतीच्या पानांमधील पोषक घटक

तुतीच्या पानांमध्ये अँटिऑक्सिडंट्स, फ्लेव्होनॉइड्स यांसारखे घटक आढळतात. तसेच व्हिटॅमिन C आणि काही B जीवनसत्त्वे, कॅल्शियम, लोह आणि पोटॅशियम यांसारखी खनिजे आहेत. यात फायबरचे प्रमाणही भरपूर असते.

Nutrients in Mulberry Leaves | pinterest

मधुमेह

तुतीच्या पानांमधील 1-DNJ हा घटक कार्बोहायड्रेटचे पचन आणि शोषण करणाऱ्या काही एन्झाइम्सची क्रिया कमी करू शकतो. त्यामुळे जेवणानंतर रक्तातील साखर वाढण्यावर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो.

Diabetes | pinterest

हृदयाचे आरोग्य

तुतीच्या पानांमधील काही जैविक सक्रिय घटक रक्तातील चरबी आणि कोलेस्ट्रॉलवर सकारात्मक परिणाम करतात.

Heart Health | pinterest

पचनक्रिया सुरळीत होते

तुतीच्या पानांमध्ये आहारातील फायबर असते. फायबरमुळे आतड्यांचे आरोग्य आणि नियमित शौचास मदत होऊ शकते.

Improved Digestion | pinterest

अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत

तुतीच्या पानांमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि पॉलीफेनॉल्ससारखे अँटिऑक्सिडंट घटक असतात. हे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यास मदत करू शकतात. त्यामुळे पेशींचे संरक्षण करण्याच्या प्रक्रियेत त्यांची भूमिका असू शकते.

Antioxidants | pinterest

खाण्याची पद्धत

सकाळी रिकाम्या पोटी, 2-3 ताजी तुतीची पाने धुऊन चावून घ्या. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्याच्या पानांचा चहा बनवूनही पिऊ शकता.

Leaves | google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT :  हार्ट अटॅक येण्यापूर्वी त्वचेवर दिसतात 'हे' ७ बदल, दुर्लक्ष करणे पडेल महागात

Heart Attack Signs | AI PHOTO
येथे क्लिक करा...