Manasvi Choudhary
महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली.
या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होणार.
योजनेसाठी कोणत्या महिला पात्र ठरणार हे थोडक्यात जाणून घेऊ.
लाडकी बहीण योजनेसाठी महिलांसाठी वयाची अट २० ते ६५ वर्ष इतकी आहे.
वार्षिक उत्पन्न २.५० लाख पेक्षा अधिक असणाऱ्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही.
सरकारी कर्मचारी तसेच निवृतीवेतन घेत असणाऱ्या महिलांना योजनेचा घेता येणार नाही.
५ एकरपेक्षा जास्त जमीन असल्यास तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठराल.
माझी लाडकी बहीण योजनेसाठी रहिवाशी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.