Saam Tv
मुघलांच्या काळात विकसित झालेली नाणी पद्धत त्यांच्या साम्राज्यांच्या समाप्तीनंतरही चालू राहिली होती.
भारतामध्ये मुघल साम्राज्याचा पाया बाबरने रोवला मात्र त्यांचा मोठा मुलगा हुमायूनने नाण्यांच्या स्वरुपात स्वत:चे चलन सुरू केले.
हिंदूस्थानात नसीरुद्दीन हुमायूँचा पराभव केल्यानंतर अफगाणचा राजा शेरशाह सुरीने दिल्लीवर राज्य केलं. आणि चांदीची नाणी तयार केली त्याला 'रुपिया' म्हटले जायचे. हा काळ इसवी सन पूर्व १५४० ते १५४५ चा होता.
पुढे हुमायुनने त्याचे मुघल साम्राज्य परत मिळवले आणि त्याच्या मुलाने म्हणजेच अकबरने स्वत:चे सगळ्यात वेगळे दिसणारे चलन सुरु केले.
शहाजहानने त्याच्या कारकिर्दीत अनेक नाणी तयार केली. तसेच सम्राटाच्या कारकिर्दीत नाण्यांच्या डिझाइनसाठी मानके निश्चित करण्यात आली.
मुघलांचा सर्वात क्रुर आणि धर्मांध राजा औरंगजेब याने नाण्यांवरील कलमा काढून टाकल्या. आणि नाण्यांचे मानक पुन्हा ठरवण्यात आले.
पुढे औरंगजेबाने सम्राट आणि टांकसाळीच्या नावासोबत नाण्यांच्या तयार होण्याच्या तारखा नमुद करायला सुरुवात केली.