Shreya Maskar
रात्रीच्या जेवणाला झणझणीत मुगाची उसळ बनवा.
मुगाची उसळ बनवण्यासाठी मोड आलेले मूग, कांदा, हिरवी मिरची, आले, कोथिंबीर, जिरे, हळद, लाल तिखट, गरम मसाला, लिंबू आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.
मुगाची उसळ बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे, कांदा आणि हिरवी मिरची घालून छान परतून घ्या.
त्यानंतर यात आले किसून टाका.
फोडणी छान शिजल्यावर त्यात मूग आणि हळद घालून मिक्स करा.
पुढे मिश्रणात आवश्यकतेनुसार पाणी, मीठ, लाल तिखट आणि गरम मसाला घालून मिक्स करा.
भाजी शिजल्यावर त्यात कोथिंबीर टाका आणि लिंबू पिळा.
शेवटी मुगाच्या उसळमध्ये चटपटीत शेव टाकून बटर पावासोबत आस्वाद घ्या.