Manasvi Choudhary
स्ट्रीट स्टाईल चणा चाट खायला सर्वांना आवडतो.
चणा चाट घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
चणा चाट बनवण्यासाठी चणे, कांदा, टोमॅटो, कैरी, तेल, राई, जिरा, हिंग, कांदा, लसूण, लाल तिखट, कोथिंबीर, मीठ हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम चणे स्वच्छ धुऊन ७ ते ८ तास भिजत घाला
नंतर चणे योग्यरित्या शिजवून घ्या.
गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये राई, जिरे आणि हिंगाची फोडणी द्या.
यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि लसूण परतून घ्या.
या संपूर्ण मिश्रणात हळद, तिंखट, मीठ घाला नंतर शिजवलेले चणे घालून संपूर्ण मिश्रण परतून घ्या.
चणा चाट तयार झाल्यावर वरतून कोथिंबीर, कांदा, कैरी कापून घाला.