Shreya Maskar
बॉलिवूड आणि साऊथ अभिनेत्री मृणाल ठाकूर आपल्या अभिनयासोबतच फॅशन सेन्समुळेही नेहमी चर्चेत असते. यावेळी तिने ब्लॅक आउटफिटमध्ये अत्यंत बोल्ड, क्लासी आणि स्टायलिश लूक कॅरी केला आहे.
मृणालने ब्लॅक रंगाचा स्लीव्हलेस आणि डीप नेकलाइन असलेला टॉप परिधान केला आहे. या टॉपला तिने हाय-वेस्ट ब्लॅक फ्रिंज स्कर्टसोबत पेअर केले आहे. स्कर्टवरील लांब आणि चमकदार फ्रिंज डिझाइनमुळे तिच्या संपूर्ण लूकला हटके आणि आकर्षक अंदाज मिळाला आहे.
आउटफिटला खास बनवण्यासाठी मृणालने गोल्ड आणि डायमंड ज्वेलरीची निवड केली आहे. गळ्यात वेगवेगळ्या डिझाइनचे लेयर्ड नेकलेस, पेंडंट असलेली लांब चेन, कानात स्टायलिश इअररिंग्स, हातात गोल्डन बांगड्या आणि बोटात स्टेटमेंट रिंग असा तिचा ज्वेलरी लूक आहे.
मृणालने स्मोकी आय मेकअप, गडद आयलायनर, मस्कारा आणि न्यूड पिंक लिपस्टिकची निवड केली आहे. चेहऱ्यावर ग्लोई बेस ठेवत तिने मेकअपला सॉफ्ट आणि ग्लॅमरस टच दिला आहे.
तर मोकळे, लांबसडक आणि सरळ केस तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहेत.पायात तिने ब्लॅक पॉइंटेड-टो हील्स परिधान केल्या आहेत. या हील्समुळे तिचा संपूर्ण लूक अधिक एलिगंट आणि फॅशनेबल दिसत आहे.
मृणाल ठाकूरने फोटोंना कॅप्शन लिहिलं की, "Noir, with a feminine twist!" या फोटोंवर चाहते भरभरून कमेंट्सचा वर्षाव करत आहे. तिच्या लूकचे कौतुक करत आहे.
मृणाल ठाकूरने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात छोट्या पडद्यावरून केली. 'कुमकुम भाग्य' या लोकप्रिय मालिकेतील बुलबुलच्या भूमिकेमुळे तिला घराघरात ओळख मिळाली. त्यानंतर तिने २०१४ मध्ये 'विट्टी दांडू'चित्रपटांमधून सिनेसृष्टीत पाऊल ठेवले.
मृणाल ठाकूरचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. तिचे इन्स्टाग्राम 16.1 मिलियन फॉलोअर्स आहेत. मृणालने हिंदीसोबत साऊथ इंडस्ट्री देखील गाजवली आहे.