ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीतून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे मृणाल ठाकूर.
मृणालने छोट्या पडद्यावरुन आपल्या करिअरची सुरुवात केली.
'कुमकुम भाग्य' या मालिकेतून तिला खरी ओळख मिळाली.
'सिता रामन' या चित्रपटातील मृणालच्या अभिनयाचे आजही कौतुक होते.
मृणाल मूळची धुळ्याची आहे. ती महाराष्ट्रीयन आहे.
मृणाल नेहमी सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.
मृणालने नुकतेच पिवळ्या रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत.
कानात झुमका, साडी असा मराठमोळा लूक मृणालने केला आहे.
मृणालच्या या फोटोवर चाहत्यांनी खूप छान प्रतिक्रिया दिल्या आहेत.