Shreya Maskar
साऊथ, मराठी, हिंदी मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकलेली अभिनेत्री म्हणजे मृणाल ठाकूर. मृणाल ठाकूरचा नुकताच 'दो दीवाने एक शहर' चित्रपट रिलीज झाला आहे.
मृणाल ठाकूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. कायम आपल्या चाहत्यांशी गप्पा मारताना मृणाल सोशल मीडियावर दिसते. नुकतेच तिने एक खास फोटोशूट केले आहे.
मृणाल ठाकूरने फोटोंमध्ये ब्लॅक रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेससोबत मृणाल ग्लॅमरस पोज देताना दिसत आहे.
मोकळे केस, गोल्डन ज्वेलरी , ग्लॉसी मेकअप यामध्ये मृणालच्या सौंदर्याला चारचाँद लागले आहेत. निसर्गाच्या सानिध्यात मृणालने फोटोशूट केले आहे.
फोटोंमधील मृणालच्या कातिल अदा पाहून चाहते घायाळ झाले आहे. फोटोंमध्ये तिचा आत्मविश्वास खूपच भारी वाटत आहे.
मृणाल ठाकूरच्या फोटोंवर "खूप सुंदर", "सुंदर तरुणी", "अप्रतिम"," जणू विश्वसुंदरीच"," मन मोहक रुप तुझे", "सौंदर्याची राणी" अशा कमेंट्स पाहायला मिळत आहेत.
मृणाल ठाकूर लवकरच Dacoit या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट 10 एप्रिल ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अलिकडेच मृणाल ठाकूरने पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतले. ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर तिने शेअर केले.