Health Tips: तोंडाला अल्सर झालंय? या घरगुती उपायांनी मिळवा झटपट आराम

Bharat Bhaskar Jadhav

अल्सरसाठी घरगुती उपाय

अनेकदा पोटातील उष्णता वाढल्याने किंवा कमी पाणी पिल्याने ही समस्या उद्भवते. औषध घेतल्याने ही समस्या दूर होत असते, परंतु औषध घेण्यापूर्वी घरगुती उपाय केले तरी तुमची ही समस्या दूर होईल.

mouth ulcers | google

मीठ आणि लवंग

एका ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मीठ मिसळा. हे मिश्रण काही वेळ तोंडात ठेवा नंतर ते चूळ भरून पाणी फेकून द्या. यानंतर एक लवंग खा.

mouth ulcers | saam

हळद

हळदीमध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. कोमट पाण्यात एक चमचा हळद मिसळा आणि चूळ भरा. यामुळे अल्सर ठीक होण्यास मदत होईल.

mouth ulcer | google

मध

मधामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. तोंडात झालेल्या फोडांवर मध लावा. यामुळे फोड म्हणजेच अल्सर लवकर बरे होतात.

mouth ulcer | pexel

बटाटा

बटाटा कापून त्याचा रस काढा. त्यानंतर हा रस तोंडाच्या अल्सर झालेल्या ठिकाणी लावा. अल्सरच्या दुखण्यापासून आराम मिळू शकतो.

mouth ulcer | pexel

खोबरेल तेल

खोबरेल तेलामध्ये अँटीफंगल आणि अँटीबॅक्टीरियल गुणधर्म असतात. तोंडात ज्या ठिकाणी अल्सर झाले आहे त्यावर ते रोज थोडे खोबरेल तेल लावा. यामुळे आराम मिळतो.

home remedies | pexel

हेही वाचा

येथे क्लिक करा

Kitchen Items That Cause Cancer | Saam