Mouth Open Sleeping Side Effects: तोंड उघडे ठेवून झोपण्याची सवय आरोग्यासाठी फायदेशीर की घातक?

Manasvi Choudhary

तोंड उघडे ठेवून झोपण्याची सवय

अनेकांना तोंड उघडे ठेवून झोपण्याची सवय असते. थकवा, सर्दीमुळे बंद नाक किंवा घोरण्याची समस्या यामुळे हा त्रास होऊ शकतो.

Mouth Open Sleeping Side Effects | pinterest

आरोग्यासाठी घातक

ही सवय अगदी सामान्य वाटत असली, तरी आरोग्यासाठी घातक ठरू शकते. नियमितपणे तोंड उघडे ठेवून झोपल्यामुळे शरीराला कोणता त्रास होतो ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Mouth Open Sleeping Side Effects | pinterest

तोंड पूर्णपणे कोरडे पडणे

झोपताना तोंड उघडे ठेवल्य मुळे तोंडातील लाळेचे प्रमाण कमी होते आणि तोंड कोरडे पडते. लाळ ही तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करण्याचे काम करते, ती कमी झाल्याने संसर्गाचा धोका वाढतो.

Dry Mouth

घसा खवखवणे आणि जळजळ होणे

तोंड उघडे ठेवल्याने हवेचा थेट संपर्क घशाशी आल्यामुळे घसा कोरडा पडतो. सकाळी उठल्यावर तीव्र स्वरूपात घसा खवखवणे , गिळताना त्रास होणे किंवा खोकला येण्याचा त्रास होतो.

Sore Throat

तोंडाची तीव्र दुर्गंधी

तोंड उघडे ठेवल्याने तोंडातील लाळ सुकल्यामुळे बॅक्टेरिया वेगाने वाढतात. यामुळे सकाळी उठल्यावर श्वासाला दुर्गंधी सुटणे आणि दातांवर पिवळसर थर साचण्याची समस्या निर्माण होते.

Bad Breath / Halitosis | Yandex

हिरड्यांच्या व दातांच्या समस्या

तोंड उघडे ठेवून झोपल्याने दात आणि हिरड्यांवर जिवाणूंचा प्रादुर्भाव वाढतो. यामुळे हिरड्या सुजणे, हिरड्यांमधून रक्त येणे, दात दुखणे आणि दात कमकुवत होण्याचा धोका वाढतो.

Gum Diseases & Tooth Decay | Yandex

ओठ फाटणे आणि सुकणे

सतत तोंडावाटे हवा बाहेर पडल्यामुळे आणि श्वास घेतल्यामुळे ओठांमधील ओलावा नाहीसा होतो, ज्यामुळे ओठ कोरडे होऊन फाटतात.

Chapped Lips

जिभेवर पांढरा किंवा मळकट थर जमा होणे

तोंडातील कोरडेपणामुळे जिभेवर बॅक्टेरिया, मृत पेशी आणि अन्नाचे कण जमा होऊन जिभेवर जाड थर तयार होतो, ज्यामुळे तोंडाची चव बिघडते.

Coated Tongue

घोरणे आणि झोप पूर्ण न होणे

तोंड उघडे ठेवून झोपणाऱ्या व्यक्तींमध्ये घोरण्याची देखील सवय असते यामुळे झोपेत अडथळा येतो.

Night snoring | pinterest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: Bathroom Mirror Benefits: बाथरूममध्ये आरसा असण्याचे फायदे काय? जाणून घ्या

Bathroom Mirror Benefits
येथे क्लिक करा...