Mountain Climbers: वजन कमी करण्यासाठी करा फक्त हा एक व्यायाम; संपूर्ण शरीराचा होईल कार्डिओ, मिळतील अनेक फायदे

Shruti Vilas Kadam

कॅलरी बर्न करण्यास मदत

माउंटन क्लाइम्बर्स हा कार्डिओ व्यायाम असल्याने हृदयाची गती वाढते आणि कॅलरी बर्न करण्यास मदत होते.

Mountain Climbers

संपूर्ण शरीराचा व्यायाम

या व्यायामात हात, खांदे, पोट, कंबर, मांड्या आणि पायांचे स्नायूंची हालचाल होते. त्यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो.

Mountain Climbers

पोटाचे स्नायू मजबूत होतात

शरीर स्थिर ठेवताना Core वर ताण येतो, त्यामुळे पोटाचे स्नायू मजबूत करण्यास मदत होते.

Mountain Climbers

पायांची ताकद वाढते

पाय आलटून-पालटून पुढे आणल्यामुळे मांड्या आणि पायांच्या स्नायूंना चांगला व्यायाम मिळतो.

Mountain Climbers

स्टॅमिना वाढण्यास मदत

नियमितपणे माउंटन क्लाइम्बर्स केल्याने शरीराचा स्टॅमिना सुधारण्यास मदत होते.

Mountain Climbers

कसे करावे?

Plank position मध्ये या. हात खांद्याखाली ठेवा. एक गुडघा छातीकडे आणा आणि पुन्हा मागे न्या. त्यानंतर दुसरा गुडघा पुढे आणा. अशी हालचाल आलटून-पालटून करा.

Mountain Climbers | Pintrest

२० वेळा करताना काळजी

सुरुवातीला २० वेळा हळूहळू करा आणि शरीराचा posture योग्य ठेवा. दम लागणे, चक्कर येणे किंवा वेदना जाणवल्यास व्यायाम थांबवा.

Mountain Climbers

Dark Underarms Tips: काळपट अंडरआर्म्सचा काळेपणा कमी करण्यासाठी 7 टिप्स; अशी घ्या काखेच्या त्वचेची काळजी

Dark Underarms Tips | Saam Tv
येथे क्लिक करा