Manasvi Choudhary
मराठमोळ्या संस्कृतीतला महत्वाचा दागिना म्हणजे मोत्याची ज्वेलरी. मोत्याची ज्वेलरी ही एक पारंपारिक दागिना आहे.
अनेक महिला नऊवारी, काठपदरी सांड्यावर मोत्याची ज्वेलरी परिधान करतात
तन्मणी आणि चिंचपेटी हे मोत्यांचे गळ्यातले हार प्रसिद्ध आहेत. चिंचपेटी मोत्याचा हार गळ्याशी घालतात.
महाराष्ट्रीयन लूकची शान म्हणजे नथ. मोत्याची नथ मध्ये ब्राह्मणी नथ आणि कारवारी नथ हे प्रकार अतिशय लोकप्रिय आहेत
साध्या आणि नाजूक मोत्यांच्या कुड्या या खुपच आकर्षक दिसतात. तरूण मुली देखील साडीवर मोत्यांच्या कुड्या घालतात.
मोत्यांचे बाजूबंद दंडावर घातल्यावर साडीचा लूक अधिकच सुंदर दिसतो
हिरव्या बांगड्यांच्या मध्ये मोत्याच्या तोड्या किंवा बांगड्या घातल्याने हातांचे सौंदर्य खुलते.