Manasvi Choudhary
बांगड्या हा केवळ दागिन्यांचा भाग नसून तो सौभाग्याचा आणि परंपरेचा एक महत्त्वाचा शृंगार आहे. लग्नात नववधू हातात हिरव्या बांगड्या परिधान करते.
हिंदू धर्मात लग्नात हिरवा चुडा घालणे अत्यंत शुभ मानले जाते. 'हिरवा चुडा' हा केवळ दागिना नसून ते नववधूच्या नवीन आयुष्याचे, समृद्धीचे आणि अखंड सौभाग्याचे प्रतीक मानले जाते.
सोन्याचे तोडे ज्यावर बारीक नक्षीकाम केलेले असते या बांगड्या तुम्ही नऊवारी किंवा काठपदर साडीवर घातल्यास लूक भारी दिसतो
डायमंड्स आणि खड्यांचा बांगड्या तुम्ही हिरव्या बांगड्याच्या मध्ये घातल्यास तुमचा लूक उठून दिसेल हा लूक तुम्ही वेस्टर्न लेहंगा किंवा भरजरी साडीवर देखील करू शकता.
देवी-देवतांच्या मूर्ती मोर किंवा हत्तीची नक्षी अश्या देखील बांगड्या असतात. या बांगड्यांना 'मॅट फिनिश' लूक दिलेला असतो कांजीवरम साड्यांवर हा लूक भारीच दिसतो
हिरव्या बांगड्यामध्ये रंगीबेरंगी बांगड्या तुम्ही घालू शकता. संगीत सोहळ्यासाठी हे रंगीबेरंगी दागिने छान दिसतात.
साडीच्या काठाचा रंगाप्रमाणे मॅचिंग बांगड्या तुम्ही परिधान करू शकता.