Shruti Vilas Kadam
पारंपरिक दागिन्यांची आवड असणाऱ्या महिलांसाठी मोठ्या आकारातील ठुशी स्टाइल मंगळसूत्र आकर्षक पर्याय ठरू शकते. काळ्या मण्यांसोबत सोन्याचे डिझाइन सुंदर दिसते.
मोठ्या मंगळसूत्रात लक्ष्मी पेंडंटचा समावेश केल्यास दागिन्याला पारंपरिक आणि रॉयल लूक मिळतो. सण-समारंभासाठी हे डिझाइन विशेष सुंदर दिसते.
काळे मणी, सोन्याची साखळी आणि मोत्यांचे कॉम्बिनेशन मंगळसूत्राला एलिगंट लूक देते. साडी किंवा सिल्कच्या पोशाखासोबत हे डिझाइन छान दिसते.
कोल्हापुरी दागिन्यांची खासियत आवडत असेल तर मोठ्या आकाराचे कोल्हापुरी पेंडंट असलेले मंगळसूत्र निवडा. पारंपरिक मराठमोळ्या लूकसाठी हा उत्तम पर्याय आहे.
सोन्याच्या नाण्यांसारख्या पेंडंटचा वापर केलेले मोठे मंगळसूत्र आकर्षक आणि रिच दिसते. लग्नानंतरच्या खास कार्यक्रमांसाठी हे डिझाइन परफेक्ट ठरू शकते.
पारंपरिक मंगळसूत्रात मॉडर्न टच हवा असेल तर डायमंड कट डिझाइन निवडा. प्रकाशात चमकणारे हे डिझाइन साडी आणि ट्रेडिशनल आउटफिटवर उठून दिसते.
जाड काळे मणी आणि मोठ्या आकाराचा आकर्षक पेंडंट असलेले मंगळसूत्र सध्या स्टेटमेंट ज्वेलरीसारखे वापरता येते. साध्या साडीवरही यामुळे लूकला खास आकर्षण मिळते.