Shruti Vilas Kadam
शरीराला केवळ पाण्याचीच नाही, तर सोडियम, पोटॅशियम आणि क्लोराइड यांसारख्या इलेक्ट्रोलाइट्सचीही गरज असते. यांचे संतुलन बिघडल्यास पाणी प्यायल्यानंतरही तहान लागू शकते.
एकाच वेळी खूप पाणी प्यायल्यास शरीरातील सोडियमसह इलेक्ट्रोलाइट्सचे प्रमाण पातळ होऊ शकते. त्यामुळे शरीरातील फ्लुइड बॅलन्सवर परिणाम होऊन तहान जाणवू शकते.
अतिप्रमाणात पाणी प्यायल्याने क्वचित हायपोनेट्रेमिया (वॉटर इंटॉक्सिकेशन) होऊ शकते. यामध्ये रक्तातील सोडियमचे प्रमाण कमी होते आणि शरीरातील द्रव संतुलन बिघडू शकते.
उष्ण वातावरणात जास्त वेळ घालवल्याने शरीरातून घामाच्या माध्यमातून पाणी आणि काही इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात. त्यामुळे पाणी प्यायल्यानंतरही काही काळ तहान कायम राहू शकते.
व्यायाम करताना मोठ्या प्रमाणात घाम आल्यास शरीरातील द्रव आणि इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात. अशावेळी केवळ पाणी प्यायल्याने तहान लगेच पूर्णपणे शांत होईलच असे नाही.
काही औषधांमुळे शरीरातून जास्त प्रमाणात द्रव बाहेर पडू शकतो. त्यामुळे फ्लुइड बॅलन्सवर परिणाम होऊन पाणी प्यायल्यानंतरही तहान जाणवू शकते. औषध स्वतःहून बंद न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
गर्मी, व्यायाम किंवा जास्त घाम आल्यानंतर तहान लागणे सामान्य असू शकते. मात्र, कोणतेही स्पष्ट कारण नसताना सतत जास्त तहान लागत असेल आणि पाणी प्यायल्यानंतरही आराम मिळत नसेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य आहे.