ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सुप्रीम कोर्टाने लोकांना इजा होऊ नये आणि कुत्र्यांची संख्या नियंत्रणात राहावी यासाठी दिल्ली-एनसीआरच्या रस्त्यांवरून भटक्या कुत्र्यांना काढून त्यांना शेल्टर होममध्ये पाठवण्याचे आदेश दिले आहेत. जगात सर्वाधिक कुत्रे कुठे आहेत, जाणून घेऊयात.
जगात सर्वाधिक कुत्रे अमेरिकेत आहेत. येथे कुत्र्यांची संख्या ७.५८ कोटी आहे. येथे पाळीव कुत्र्यांसाठी विशिष्ट कायदे आणि कडक नियम आहेत.
ब्राझीलमध्ये कुत्र्यांची एकूण संख्या ३.५७ कोटी आहे. येथे जवळजवळ प्रत्येक दुसऱ्या घरात एक कुत्रा आहे.
चीनमध्ये पाळीव कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बीजींगमध्ये याआधी कुत्रे पाळण्यासाठी बंदी होती, नंतर मात्र ही बंदी उठवण्यात आली. सध्या चीनमध्ये एकूण कुत्र्यांची संख्या २.७४ कोटी आहे.
भारतात सुमारे १.५३ कोटी भटके कुत्रे आहेत आणि पुढील एका वर्षात त्यापैकी ७०% कुत्र्यांचे लसीकरण आणि नसबंदी करण्यात येणार आहे, अशी माहिती सरकारद्वारे देण्यात आली आहे.
रशियामध्ये एकूण कुत्र्यांची संख्या १.५ कोटी आहे तर जपानमध्ये १.२ कोटी आणि फिलिपिन्समध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या १.१६ कोटी आहे. येथे भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
जगात सर्वाधिक कुत्र्यांच्या यादीमध्ये अर्जेंटिना ८व्या क्रमांकावर तर फ्रान्स ९व्या क्रमांकावर आहे. अर्जेंटिनामध्ये ९३ लाख तर फ्रान्समध्ये ७४ लाख कुत्रे आहेत. तर रोमानिया देशात कुत्र्यांची संख्या ४१ लाखांवर आहे.