ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्या शरीरात यकृत (Liver)अनेक प्रकारे काम करते. हे रक्तातील विषारी पदार्थ काढून टाकणे आणि प्रोटीन तयार करण्यासह अनेक कार्ये करते.
लिव्हर इन्फेक्शनची अनेक लक्षणे असू शकतात. ज्यात पोटदुखी समावेश आहे. जर तुम्हालाही ही तक्रार असेल तर सावध रहा.
लिव्हर इन्फेक्शन असल्यास रुग्णाला जेवण्याची इच्छा राहत नाही. आणि पोट नेहमी भरलेले वाटते.
एखाद्याला लिव्हर इन्फेक्शन असल्यास रुग्णाला नेहमी मळमळणे आणि उलट्या होण्याचा त्रास जाणवतो.
त्वचेवर खाज सुटणे किंवा पुरळ येत असेल तर हे लिव्हर इन्फेक्शनची लक्षणे असू शकतात.
लघवीचा रंग बदलणे हे देखील लिव्हर इन्फेक्शनची लक्षणं आहे.
लिव्हर इन्फेक्शनमुळे ताप येऊ शकतो. वारंवार ताप येणे हे लिव्हर इन्फेक्शनची लक्षण आहे.