ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुम्ही अनेकदा भुताच्या गोष्टी ऐकल्या असतील, परंतु या झपाटलेल्या ठिकाणांबद्दल ऐकले आहे का, वाचा.
आज आम्ही तुम्हाला अशाच एका गावाबद्दल सांगणार आहोत जे इतके झपाटलेले आहे की त्याचे नाव गिनीज बुकमध्ये नोंदवले गेले आहे.
इंग्लंडमधील प्लकली गावाबद्दल असे म्हटले जाते की, येथे 15 ते 17 भुते आहेत.
1989 मध्ये, ब्रिटनमधील सर्वात भयानक गाव म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद झाली.
या गावात प्रसिद्ध असलेल्या भुतांच्या अनेक वेगवेगळ्या कथा आहेत, त्यापैकी सर्वात प्रसिद्ध म्हणजे "स्क्रीमिंग मॅन".
या गावावर अनेक प्रकारचे संशोधन देखील झाले आहे ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की या ठिकाणी अनेक अदृश्य शक्ती आहेत.
हे गाव अगदी सामान्य दिसतं, पण इथे अनेक लोकांची हत्या झाली आहे, म्हणूनच लोक भूत असल्याचे मानतात.