Haunted Island: जगातील सर्वात भयानक झपाटलेले बेट, आवाज, आत्म्यांचा त्रास! वाचा सविस्तर

Dhanshri Shintre

पोवेग्लिया बेट, इटली

व्हेनिस आणि लिडोच्या मध्ये असलेल्या या बेटावर पूर्वी प्लेगग्रस्त रुग्णांना एकटे ठेवले जात असे, आणि आजही तिथे आत्मे भटकत असल्याचे मानले जाते.

डॉल्स आयलंड, मेक्सिको

हे ठिकाण अत्यंत भयानक मानले जाते. डॉन ज्युलियनने मुलीच्या भूताला शांत करण्यासाठी बाहुल्या झाडांवर लटकवल्या, नंतर विचित्र घटना वाढल्या.

अल्काट्राझ बेट, कॅलिफोर्निया

अल्काट्राझ बेट एकेकाळी अत्यंत सुरक्षित अमेरिकन तुरुंग होता, जिथे धोकादायक कैद्यांना ठेवले जाई, आणि आजही काही कोठड्यांमध्ये भुताटकीचा अनुभव येतो.

नॉरफोक बेट, ऑस्ट्रेलिया

नॉरफोक बेटाला ‘पृथ्वीवरील नरक’ म्हणतात, कारण येथे कधी काळी ब्रिटिश सरकारने धोकादायक गुन्हेगारांना ठेवले आणि अनेक हिंसक मृत्यू घडले.

ला गायोला बेट, इटली

ला गायोला बेट अनेक अघोरी आणि रहस्यमय घटनांनी भरलेले आहे; असे मानले जाते की ते विकत घेणाऱ्याचे नशीब लवकरच वाईट होते.

डक्सा बेट, क्रोएशिया

२००९ मध्ये क्रोएशियातील डाक्सा बेटावर सामूहिक कबरी सापडल्या, आणि तपासात अनेक मानवी अवशेष मिळाले, ज्यामुळे हे बेट आजही भुताटकीचे मानले जाते.

Corregidor बेट, फिलीपिन्स

दुसऱ्या महायुद्धात फिलीपिन्समधील कोरेगिडोर बेटावर हजारो जपानी सैनिकांनी आत्महत्या केली होती, आणि आजही येथे विचित्र, भुताटकी घडामोडी पाहायला मिळतात.

ओकिनावा बेट, जपान

जपानमधील ओकिनावा बेट ८२ दिवसांच्या भयाण युद्धाचे साक्षीदार ठरले, जिथे हजारो मृत्यू झाले आणि आजही येथे विचित्र घटना अनुभवल्या जातात.

आयल ऑफ वाइट, इंग्लंड

ब्रिटनमधील आयल ऑफ वाईट हे सर्वाधिक झपाटलेले बेट मानले जाते, जिथे टीबी रुग्णांच्या आत्मा विव्हळताना आणि तरंगताना दिसतात.

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

NEXT: भारतातील सर्वात लहान दोन अक्षरांचे नाव असलेले रेल्वे स्टेशन कोणते?

येथे क्लिक करा