ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक बाउंड्रीज मारणारे खेळाडू कोण, माहितीये का, जाणून घ्या.
या यादीत शिखर धवन पहिल्या स्थानावर आहे. शिखरने आपल्या करिअरमध्ये एकूण ७६८ बाउंड्रीज मारले आहेत.
विराट कोहली या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. विराटने तुफान फटकेबाजी करत ७११ बाउंड्रीज मारले आहेत.
रोहित शर्माने आयपीएलमध्ये एकूण ६०१ बाउंड्रीज मारले आहेत. तो या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.
ऑलराउंडर सुरेश रैनाने आपल्या आयपीएल करिअरमध्ये ५०६ बाउंड्रीज मारले आहेत.
गौतम गंभीरने आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेविल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स या दोन्ही संघाकडून खेळताना ४९२ बाउंड्रीज मारले आहेत.
अजिंक्य रहाणे आयपीएलमध्ये ७ संघाचा भाग राहिला आहे. या संघाकडून खेळताना त्याने ४८५ बाउंड्रीज मारले आहेत.