Saam Tv
पावसाळ्यात स्वर्ग धरातीवर उतरतो. सगळीकडे हिरवाईची चादर पसरलेली असते, डोंगरकड्यांवर असणारी मंदिर, त्यांच्या आजूबाजूचा प्रदेश नयनरम्य होतो.
हिमालयाच्या बर्फाच्या कुशीत वसलेले हे मंदिराचे दृश्य पावसाळ्यात मनमोहक असते . दाट धुक्याची चादर , हिरव्यागार टेकड्या व बर्फाच्छादित शिखरे आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे मंदाकिनी नदीच्या खळाळत्या आवाजामुळे वातावरण शांत असते.
मंदिराच्या आजूबाजूच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये हिरवा गालिचा पसरलेला असतो. धुक्याची चादर आणि ढगांनी वेढलेले मंदिर, चोपटा ते तुंगनाथचा ट्रेक रानफुलांनी बहरलेला असतो.
बैजनाथ मंदिर हे ऐतिहासिक मंदिर आहे. हिरवेगार डोंगर,पर्वतरांगा आणि जवळून वाहणारी बिनवा नदी मंदिाराचे सौंदर्य आणखीनच खुलवत असत
पावसाळ्यात हम्पीमधील विरुपाक्ष मंदिर पावसाळ्यात आजूबाजूला असलेल्या टेकड्या आणि केळीचे मळे यांमुळे हिरवाईने नटून जाते.
महाराष्ट्रात सह्याद्रीच्या घनदाट जंगलात भीमाशंकराचे मंदिर वसलेले आहे. आजूबाजूला असणारे झरे, धबधबे,धुक्याची चादर यांमुळे मंदिराचे सौंदर्य अधिक खुलुन निघते.
पावसाळ्यात मुरुडेश्वर मंदिर अत्यंत भव्य, दिव्य आणि अद्भुत दिसते. हे मंदिर तीनही बाजूंनी अरबी समुद्राने वेढलेले असल्याने पावसाळ्यात येथील निसर्गाचे रूप अधिकच रौद्र आणि सुंदर असते.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील इंटरनेटवरील माहिती उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली आहे. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी साम टिव्ही समर्थन करत नाही.