Manasvi Choudhary
मुंबई म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो अथांग पसरलेला अरबी समुद्र आणि त्याच्या किनाऱ्याला लागून असलेला मरीन ड्राईव्ह. मुंबई येथे मरीन ड्राईव्ह पाहण्यासाठी परदेशातून पर्यटक खास येतात.
मरीन ड्राईव्हला 'क्वीन्स नेकलेस' या नावाने देखील ओळखले जाते तुम्हाला माहितीये का?
संध्याकाळी सूर्यास्त पाहण्यासठी येथे मोठी गर्दी होते. समुद्रात मावळणारा सूर्य पाहणे हा मरीन ड्राईव्हचा सर्वात सुंदर अनुभव आहे. संध्याकाळच्या वेळी येथील नॅचरल लाईट टिपण्यासाठी अनेक फोटो ग्राफर्स असतात.
मरीन ड्राईव्हच्या किनाऱ्यावर बसलं की समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकत बसणे म्हणजे मन सुखावून जाते.
असं म्हणतात मुंबई कधीच झोपत नाही यासाठी रात्रीची मुंबई अनुभवण्यासाठी खास पर्यटकांची गर्दी होते.रात्रीच्या वेळी थंड वाऱ्याची झुळूक अंगावर घेत इथे फिरण्याचा आनंद काही वेगळाच असतो.
तुम्ही लोकल किंवा टॅक्सीने प्रवास करत असाल तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्टेशनवरून १० मिनिटाच्या अंतरावर पोहोचू शकता.