Manasvi Choudhary
घरामध्ये सायंकाळच्या वेळी डास येतात. डासांमुळे अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. यामुळे डासांना पळून लावण्यासाठी डासांचे लिक्विड, कॉईल आणि अगरबत्ती वापरतात.
मात्र तुम्हाला माहितीये का? डासांसाठी तुम्ही वापरत असलेली अगरबत्ती आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
कारण अगरबत्तीमुळे होणारा धुर हा आरोग्यासाठी हानिकारक आहे. अगरबत्तीतून विषारी धूर बाहेर पडतो यामुळे घरात अगरबत्ती लावल्यास धुराचा त्रास होऊन बेशुद्ध पडण्याचा धोका अधिक आहे.
अगरबत्तीच्या धुरामुळे डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळ, उलट्या, श्वास घ्यायला त्रास होतो. अगरबत्तीतून येणाऱ्या धुरामुळे फुफ्फुसाचा आजार होऊ शकतो.
डासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करा. ज्या ठिकाणी डास येतात तेथे कापूर जाळा.
लसणात अनेक जंतुनाशक गुणधर्म असतात यामुळे कीटक पळवून लावायचे असतील तर तुम्ही लसणाच्या पाकळ्या पाण्यात टाकून उकळवा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.