Morning Tips For Women: महिलांनी सकाळी उठल्यानंतर चुकूनही या ५ गोष्टी करू नयेत: घरात सुख-समृद्धीसाठी जाणून घ्या महत्त्वाचे नियम!

Manasvi Choudhary

दिवसाची सुरूवात

सकाळी प्रत्येकाच्या दिवसाची सुरूवात होते. सकाळी सकारात्मकतेने दिवसाची सुरूवात करणे अत्यत महत्वाचे आहे. महिलांनी सकाळी उठल्याबरोबर काय करू नये ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Morning Tips For Women | Google

वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्रामध्ये महिलांना घराची 'लक्ष्मी' मानले जाते. घरातील शांतता, आर्थिक स्थिती आणि समृद्धी ही घरातील महिलांच्या दैनंदिन सवयींशी जोडलेली असते.

Vastu Tips | pintrest

महिलांनी सकाळी काय करणे टाळावे

घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा आणि माता लक्ष्मीचा वास राहावा, यासाठी महिलांनी सकाळी उठल्याबरोबर कोणत्या ५ गोष्टी करणे टाळावे, हे पाहूया.

Morning Tips For Women | Google

उंबरठ्यावर बसणे टाळा

अनेकदा सकाळी उठल्यानंतर महिला घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर बसतात. वास्तुशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार, उंबरठा हे माता लक्ष्मीच्या आगमनाचे स्थान असते. सकाळी उंबरठ्यावर बसल्याने माता लक्ष्मी नाराज होते, असे मानले जाते. त्यामुळे सकाळी उठल्यावर सर्वप्रथम उंबरठा स्वच्छ पुसून घ्यावा.

Avoid Sitting on the Threshold

सकाळी उठल्याबरोबर वाद घालणे टाळा

ज्या घरामध्ये सकाळच्या वेळी कटकट, ओरडणे किंवा भांडणे होतात, तिथे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि माता लक्ष्मी कधीही वास करत नाही. दिवसाची सुरुवात नेहमी शांतपणे आणि आनंदी संवादाने करावी.

Avoid Morning Arguments

स्वतःची सावली पाहू नका

सूर्योदय पूर्वेला होत असल्याने सकाळी घराबाहेर पडल्यास आपली सावली पश्चिमेकडे पडते. वास्तुशास्त्रानुसार, सकाळी पश्चिमेकडे दिसणारी सावली हे 'राहू' ग्रहाचे लक्षण मानले जाते, जे अशुभ मानले जाते. त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर स्वतःची सावली पाहणे टाळावे.

Do Not Look at Your Own Shadow | Google

नशिबाला दोष देणे किंवा रडणे टाळा

अनेक स्त्रिया सकाळी उठताच कामाच्या ताणामुळे किंवा अडचणींमुळे स्वतःच्या नशिबाला दोष देतात किंवा नाराज होतात. सकाळच्या वेळी नकारात्मक विचार केल्यास संपूर्ण दिवस तणावात जातो आणि प्रगतीत अडथळे येतात.

Stop Blaming Luck | Yandex

स्नान केल्याशिवाय स्वयंपाकघरात प्रवेश करू नका

स्वयंपाकघर हे घरातील अत्यंत पवित्र स्थान मानले जाते, जिथे देवी अन्नपूर्णा वास करते. त्यामुळे सकाळी उठल्यावर स्नान न करता किंवा अस्वच्छ अवस्थेत स्वयंपाकघरात प्रवेश करून स्वयंपाक करणे टाळावे. स्वच्छतेमुळे घरात आरोग्य आणि समृद्धी टिकून राहते.

Bath Before Entering Kitchen | pinterest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Canva

NEXT: लठ्ठ महिलांसाठी साड्यांचे बेस्ट कलेक्शन, या 5 डिझाईन्स नक्की आवडतील

Net Saree
येथेे क्लिक करा...