Sakshi Sunil Jadhav
चहा हा दिवसात कितीही घेतला तरी काहींचं मन भरत नाही.
चहा प्यायल्याने सकाळी फ्रेश वाटतं आणि आपण कामाला सुरुवात करतो.
एखाद्या व्यक्तीचे वजन कमी असेल तर त्यांना चहा टाळण्याचा पर्याय दिला जातो.
आयुर्वेदिक डॉक्टरांच्या माहितीनुसार चहामध्ये पुढील ३ गोष्टींचा समावेश केल्याने वजन झरझर कमी होऊ शकतं.
चहा तयार करताना त्यामध्ये पुदिन्याच्या पानांचा वापर करू शकता.
पुदिन्यातील गुणधर्मांनी पचनक्रिया सुधारते आणि भूक नियंत्रणात राहते.
चहामध्ये तुम्ही खायची बडीशेप काही प्रमाणात घालू शकता.
बडीशेपमधील एंथोल नावाच्या तत्वाने पचन तंत्र मजबूत होते आणि शरीरातील विषारी तत्वही बाहेर पडतात.
शरीरातील फॅट कमी होण्यासाठी हिरवी वेलचीचा वापर केल्याने आपल्याला फायदा मिळू शकतो.