Sakshi Sunil Jadhav
महाराष्ट्रातल्या सातपुड्याच्या डोंगर रांगामध्ये १२ ठिकाणचे पाणी एकत्र येऊन कोसळणारा धबधबा आहे.
पावसाळ्यात महाराष्ट्रात प्रंचड वेगाने वाहणाऱ्या धबधब्यांपैकी हा एक धबधबा आहे.
नंदुरबारपासून सुमारे ९०-१०० किमी अंतरावर हा धबधबा आहे.
नंदुरबारहून धडगाव मार्गे सहेली गावाकडे जाऊन पुढे थोडं जंगल ट्रेकिंग करून या धबधब्याला भेट देऊ शकता.
बिलगावमधल्या उदय नदीवर बारामुखी धबधबा आहे.
तोरणमाळ हे थंड हवेचे सुंदर ठिकाण आणि प्रसिद्ध धबधबा आहे.
नंदुरबार जिल्ह्याच्या सातपुड्याच्या पर्वत रांगेत वसलेला सातपुडा धबधबा आहे.
नंदुरबारजवळ वाण्याविहीरीजवळ दहेल आणि देव नदीच्या संगमावर हे धबधबे आहेत.