ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे जास्त वजन वाढण्याची, लठ्ठपणाची समस्या सतत वाढत आहे.
आम्ही तुम्हाला काही सुपरड्रिंक्सबद्दल सांगणार आहोत जे तुमचे वजन कमी करण्यास मदत करतील.
पोटाची चरबी कमी करण्यासाठी कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिक्स करु सेवन करु शकता.
एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू आणि मध घालून सकाळी रिकाम्या पोटी पिऊ शकता. यामुळे पचनाची गती वाढते.
रात्री एक चमचा ओवा पाण्यात भिजत ठेवा. आणि सकाळी हे पाणी रिकाम्या पोटी प्या.
ओव्यामध्ये फॅट बर्न करणारे एंझाइम असतात. यामुळे सूज आणि चरबी दोन्ही कमी होते.
दालचिनीचे पाणी शरीरात फॅट स्टोरेज रोखण्यास मदत करते. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते आणि वेट लॉस होतो.