ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुमच्याही किचन सिंकमधून घाण कुबट वास येतोय मग आजच हे घरगुती उपाय करा.
सिंकमध्ये एक कप बेकिंग सोडा आणि व्हिनेगर घाला आणि १५ मिनिटे तसेच ठेवा, नंतर ते पाण्याने स्वच्छ करा.
मीठ आणि बेकिंग सोडा यांचे मिश्रण घाला आणि कोमट पाण्याने सिंक धुवा.
लिंबाची साले काही वेळ सिंकमध्ये ठेवा. नंतर यामध्ये गरम पाणी ओता. त्यामुळे दुर्गंधी दूर होईल.
आठवड्यातून एकदा सिंकमध्ये उकळते पाणी ओतल्याने पाईपमधील ब्लॉकेजेस टाळता येतात.
स्वयंपाकघरातील कचऱ्यापासून बनवलेल्या बायो-एंझाइमने तुमचे सिंक स्वच्छ करा.
जर पाईपमधील ब्लॉकेजची समस्या कायम राहिली तर प्लंबरची मदत घ्या.