Manasvi Choudhary
चमकदार त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी व सकाळी उठल्यानंतर त्वचेची योग्य काळजी घेणे महत्वाचे आहे.
सकाळी उठल्यानंतर तुम्ही स्किनकेअर रूटीन फॉलो केल्यास त्वचा निरोगी आणि ग्लो करते.
सकाळी उठल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवा त्यानंतर फेसवॉश वापरा म्हणडे चेहऱ्यावर साचलेली धूळ आणि तेल निघून जाईल.
चेहरा धुतल्यानंतर त्वचेवर टोनर वापरा टोनर नसेल तर तुम्ही गुलाबपाणी वापरू शकता. यामुळे त्वचेची छिद्रे बंद होतात त्वचा टाईट राहते.
टोनरनंतर व्हिटॅमिन-सी सिरमचे काही थेंब चेहऱ्यावर लावा. हे अँटी-ऑक्सिडंट म्हणून काम करते आणि त्वचेवर नैसर्गिक चमक आणते.
त्वचा तेलकट असली तरीही मॉइश्चरायझर लावणे गरजेचे आहे . यामुळे त्वचा हायड्रेटेड राहते आणि दिवसभर मऊ वाटते.
त्वचेवर सनस्क्रिन लावायला विसरू नका तुम्ही घरात राहा किंवा घराबाहेर जा तरीही सनस्क्रिन लावणे महत्वाचे आहे.