Manasvi Choudhary
थंडीच्या दिवसात शरीराची विशेष काळजी घ्यावी लागते थंडीमुळे शरीर सुन्न पडते यामुळे शरीराचा व्यायाम करणे महत्वाचे आहे.
शवासन हा व्यायाम प्रकार शरीरासाठी महत्वाचा आहे. हा व्यायाम प्रकार केल्याने दिवसभराचा थकवा निघून जातो.
शवासन केल्याने शरीर रिलॅक्स होते मानसिक त्रास कमी होण्यास मदत होते.
शवासन केल्याने मेंदूला पूर्ण विश्रांती मिळाल्याने स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारते.
ज्यांना रात्री लवकर झोप येत नाही, त्यांनी झोपण्यापूर्वी ५ मिनिटे शवासन केल्यास गाढ झोप लागते.
जमिनीवर योगा मॅट टाकून पाठीवर सरळ झोपा. दोन्ही पायांमध्ये १ ते १.५ फुटाचे अंतर ठेवा. हात शरीरापासून थोडे लांब ठेवा आणि तळवे आकाशाच्या दिशेला असू द्या.
डोळे हलके मिटून संपूर्ण शरीर सैल सोडा. शरीराच्या कोणत्याही भागावर ताण घेऊ नका
श्वासावर लक्ष केंद्रित करा. हळूहळू लक्ष श्वासाकडे वळवा किमान ५ ते १० मिनिटे या स्थितीत राहा.