Morning Routine: सकाळच्या या १० सवयी लावून घ्या, दिवसभर राहाल ताजेतवाने...

Shruti Vilas Kadam

सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्या

रात्रीच्या झोपेनंतर शरीराला पाण्याची गरज असते. त्यामुळे सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यास मदत होते.

drink water | pinterest

रोज ठरलेल्या वेळी उठा

दररोज जवळपास एकाच वेळी उठण्याची सवय लावा. यामुळे शरीराचे जैविक घड्याळ सुरळीत सुरु राहते आणि रात्री वेळेवर उठण्यापासून सकाळी पोट साफ होण्यापर्यंत सगळी काम नीट होतात.

Sleep Health

सकाळी व्यायाम करा

सकाळी १० ते १५ मिनिटे चालणे, स्ट्रेचिंग किंवा योगासने केल्याने शरीर सक्रिय होते. नियमित व्यायाम केल्याने मन प्रसन्न राहण्यास आणि दिवसभरातील काम उत्साह होण्यास मदत मिळते.

Yoga | pinterest

सकाळच्या कोवळ्या उन्हात थोडा वेळ घालवा

सकाळच्या कोवळ्या उन्हामुळे शरीराचे जैविक घड्याळ सुरळीत सुरु राहण्यास मदत होते. त्यामुळे झोपेची सायकल नीट सुरु राहण्यास मदत होते.

to walk | pinterest

हेल्दी नाश्ता करा

सकाळच्या नाश्त्यात पोहे, मूग, अंडी, दही, ओट्स किंवा फळांसारख्या पौष्टिक पदार्थ खा. यामध्ये प्रोटिन, फायबर असल्याने पोट भरल्यासारखे राहते.

Breakfast | pinterest

ध्यान आणि दीर्घ श्वसन करा

सकाळी ५ ते १० मिनिटे ध्यान किंवा प्राणायम केल्याने मन शांत राहण्यास आणि एकाग्रता वाढण्यास मदत होऊ शकते. दिवसाची सुरुवात शांतपणे केल्याने दिवस सुरळीत जातो.

yoga poses for periods

उठल्याबरोबर मोबाईल पाहणे टाळा

सकाळी उठताच सोशल मीडिया, मेसेज आणि बातम्या पाहण्याऐवजी स्वतःसाठी थोडा वेळ द्या. दिवसातील महत्त्वाच्या कामांची यादी तयार करा. यामुळे लक्ष केंद्रित करण्यास मदत होऊ शकते.

Mobile | freepik

Diabetes Control Food: डायबिटिजचा धोका कमी करतात 'हे' पदार्थ, शुगर कंट्रोल करण्यासाठी नक्की खा

Diabetes Control Food | Saam Tv
येथे क्लिक करा