Shruti Vilas Kadam
सकाळी उठल्यानंतर शरीर काही तास स्थिर अवस्थेत असते. त्यामुळे सुरुवातीला हलके स्ट्रेचिंग केल्याने शरीराची हालचाल सुरू करण्यास मदत होते. मान, खांदे, हात आणि पायांचे हलके स्ट्रेचिंग करा.
स्क्वॅट्स हा शरीराच्या खालच्या भागासाठी प्रभावी व्यायाम आहे. योग्य पद्धतीने केलेले स्क्वॅट्स पाय आणि ग्लूट्सच्या स्नायूंना सक्रिय करण्यास मदत करतात. सुरुवातीला कमी रिपीटेशनपासून सुरुवात करा.
जंपिंग जॅक्समुळे शरीराची हालचाल वाढते आणि हृदयाची गतीही वाढू शकते. सकाळच्या छोट्या वर्कआउटमध्ये हा व्यायाम केल्याने शरीर अधिक सक्रिय वाटू शकते.
लंजेस हा पाय आणि ग्लूट्सच्या स्नायूंवर काम करणारा व्यायाम आहे. एका पायाने पुढे पाऊल टाकून शरीर खाली नेऊन पुन्हा सुरुवातीच्या स्थितीत या. दोन्ही पायांनी हा व्यायाम करा.
प्लँक हा कोअर स्नायूंना सक्रिय करणारा व्यायाम आहे. शरीर सरळ रेषेत ठेवून काही सेकंद प्लँकची स्थिती कायम ठेवा. नवशिक्यांनी कमी वेळेपासून सुरुवात करून हळूहळू वेळ वाढवावा.
व्यायामानंतर काही वेळ खोल श्वास घ्या. हळूहळू श्वास आत घेऊन बाहेर सोडल्याने शरीर आणि मन रिलॅक्स होण्यास मदत होते. त्यामुळे सकाळची सुरुवात अधिक शांत आणि फ्रेश वाटू शकते.
व्यायाम करताना हालचाली योग्य पद्धतीने करणे महत्त्वाचे आहे. चक्कर, तीव्र वेदना किंवा अस्वस्थता जाणवल्यास व्यायाम थांबवा. शरीराच्या क्षमतेनुसार व्यायामाची तीव्रता ठरवा.