Shruti Vilas Kadam
पाठीवर झोपल्याने मणक्याची नैसर्गिक स्थिती टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते. योग्य उंचीची उशी वापरणे महत्त्वाचे आहे.
काही लोकांना डाव्या कुशीवर झोपणे आरामदायी वाटते. विशेषतः जेवल्यानंतर लगेच झोपण्याऐवजी थोडे अंतर ठेवणे योग्य.
उजव्या कुशीवर झोपणेही अनेकांसाठी आरामदायी असते. मात्र प्रत्येक व्यक्तीसाठी झोपण्याची आरामदायी पॉझिशन वेगळी असू शकते.
कुशीवर झोपताना गुडघ्यांच्या मध्ये उशी ठेवल्यास शरीराचा पोश्चर संतुलित ठेवण्यास मदत होऊ शकते.
पोटावर झोपल्याने मान एका बाजूला वळलेली राहू शकते आणि काही लोकांमध्ये मान किंवा पाठदुखी वाढू शकते.
उशी खूप उंच किंवा खूप सपाट नसावी. मान आणि मणका शक्य तितक्या नैसर्गिक स्थितीत राहतील अशी उशी निवडणे चांगले.
झोपेची एकच ‘सर्वांसाठी योग्य’ पॉझिशन नसते. शरीराला आराम मिळतो आणि वेदना होत नाहीत, अशी स्थिती निवडणे महत्त्वाचे आहे.