केस लवकर वाढवण्यासाठी सकाळी की रात्री तेल कधी लावावे? योग्य वेळ काय?

Manasvi Choudhary

केसांची घ्या काळजी

केस लांब पाहिजेत असे प्रत्येक महिलेला वाटते यासाठी महिला केसांना चापूनचुपून तेल लावतात. केसांना तेल लावण्याचे अनेक फायदे आहेत. केसांना तेल लावल्याने केसांची वाढ होते. केस लवकर वाढतात.

Fast Hair Growth Tips | yandex

केसांना लावा तेल

मात्र तुम्हाला माहितीये का? केसांच्या वाढीसाठी तुम्ही योग्य वेळी केसांना तेल लावणं महत्वाचं आहे.

Fast Hair Growth Tips

केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत

आयुर्वेदानुसार, रात्रीची वेळ केसांना तेल लावण्यासाठी योग्य मानली जाते. रात्री केसांना तेल लावल्याने टाळूला पोषण मिळते तसेच शांत झोप लागते.

Fast Hair Growth Tips

रक्ताभिसरण सुधारते

रात्री झोपण्यापूर्वी केसांना तेल लावल्याने डोक्याचे रक्ताभिसरण सुधारते. पोषणतत्वे केसांमध्ये व्यवस्थित पोहचतात.

Hair Oil | yandex

केस नीट धुवा

केसांना तेल लावल्यानंतर केसांचा व्यवस्थित मसाज करा त्यानंतर सौम्य शॅम्पूने केस धुवा म्हणजे केसांची वाढ चांगली होईल.

Hair wash

सकाळी लावा तेल

मात्र तुम्हाला जर रात्री केसांना तेल लावणं शक्य नसेल तर तुम्ही सकाळी केसांना तेल लावू शकता.

Fast Hair Growth Tips

अशी घ्या केसांची काळजी

सकाळी केसांना तेल लावल्यानंतर केसांची काळजी घ्या. सकाळी केसांना तेल लावल्यानंतर १ ते २ तासांसाठी केस तसेच ठेवा.

Fast Hair Growth Tips

केसांमध्ये घाण चिकटते

जास्तवेळ केसांना तेल लावल्याने केसांमध्ये घाण चिकटू शकते ज्यामुळे केस गळू शकतात.

Fast Hair Growth Tips

किती वेळा लावावे तेल

केसांना तेल लावण्याची वेळच नाही तर तुम्ही कितीवेळा लावता हे देखील महत्वाचे आहे. आठवड्यातून २ ते ३ वेळा केसांना तेल लावणं महत्वाचं आहे. रोज तेल लावल्याने केसांच्या टाळूवरची त्वचा तेलकट होऊ शकते ज्यामुळे पोर्स बंद होतात.

Fast Hair Growth Tips

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: कमी वेळात झटपट बनवा नाश्त्याच्या 5 सोप्या रेसिपी, ऑफिससाठी एकदम बेस्ट

Easy Recipes Of Office Breakfast:
येथे क्लिक करा...