Shreya Maskar
मुगाचे थालीपीठ बनवण्यासाठी मोड आलेले मूग, तेल, बेसन आणि तीळ इत्यादी पदार्थ लागतात.
गव्हाचे पीठ, ज्वारीचे पीठ आणि तांदळाचे पीठ इत्यादी पीठ लागतात.
ओवा, हळद , लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ आणि धणे पूड इत्यादी मसाले लागतात.
मुगाचे थालीपीठ बनवण्यासाठी सर्वप्रथम मोड आलेले मूग, लसूण आणि हिरव्या मिरची मिक्सरला वाटून घ्या.
ही पेस्ट बाऊलमध्ये काढून त्यात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, धणे पूड, ओवा, हळद, तीळ घालून छान मिक्स करा.
आता या मिश्रणात गहू, ज्वारी, बेसन आणि तांदळाचे पीठ घालून एकजीव करून घ्या.
या पिठाची पोळी लाटून तेलामध्ये खरपूस भाजून घ्या.
पुदिन्याची चटणी किंवा दहीसोबत थालीपीठाचा आस्वाद घ्या.