Shreya Maskar
दह्याचे श्रीखंड बनवण्यासाठी सर्वप्रथम एका सुती कपड्यात दही घट्ट बांधून ठेवा.
हाताने दाबून त्यातील सर्व पाणी काढून टाका.
एका वाटीत गरम पाणी करून त्यात १० ते १२ केशराच्या काड्या टाकून ठेवा.
आता एका बाऊलमध्ये दही, पिठीसाखर, केशराचे पाणी आणि वेलची पावडर टाका.
लक्षात ठेवा केशरचे पाणी कमी असावे.
आता तयार मिश्रण १५ मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा.
तुम्ही त्यात तुमच्या आवडीचा सुखामेवा बारीक करून टाकू शकता.
अशाप्रकारे केशर श्रीखंडाचा गरमागरम पुरीसोबत आस्वाद घ्या.