Shreya Maskar
बाळंतपणानंतर आईला ताकदीची जास्त गरज असते. तेव्हा मूग डाळीचे सूप प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि हाडांमध्ये ताकद येते.
मूग डाळीचे सूप बनवण्यासाठी मूग डाळ, लवंग, जिरे पावडर, आले, हळद, गरम मसाला, साखर, तूप इत्यादी साहित्य लागते.
मूग डाळ स्वच्छ धुवून कोमट पाण्यामध्ये एक तास भिजत ठेवा.
एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यात लसूण, आले, दालचिनी, लवंग, जिरे पावडर, गरम मसाला टाकून छान परतून घ्या.
मूग डाळ कुकरमध्ये उकडून घ्या. फक्त एक शिट्टी होऊ द्या.
एका पॅनमध्ये ही मूग डाळ हळद, पाणी, साखर टाकून उकळी काढून घ्या.
डाळ सतत ढवळत रहा. जेणेकरून ती मऊ होईल. अशाप्रकारे मूग डाळ सूप तयार झाले.
गरमागरम मूग डाळीचे सूप डिलिव्हरीनंतर रोज आईला प्यायला द्या.
मूग डाळ मधील पोषक घटक शरीराला तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतात.