Shreya Maskar
वजन कमी करण्यासाठी व्यायाम आणि डाएटसोबतच हेल्दी जेवण करणेही गरजेचे असते. तुम्ही रोजच्या आहारात मूग डाळीचे सेवन करा. तुमचे वजन झपाट्याने कमी होण्यास मदत मिळेल.
मूग डाळ वजन कमी करण्यासाठी रामबाण उपाय आहे. त्यात कॅलरीज कमी आहेत, वनस्पती प्रथिने जास्त आहेत आणि आहारातील फायबर भरपूर आहे.
मूग डाळ बनवण्यासाठी प्रथम मूग डाळ स्वच्छ धुवून १५ ते २० मिनिटे भिजत ठेवा. प्रेशर कुकरमध्ये पाणी, हळद, मीठ आणि टोमॅटो घालून दोन शिट्ट्या होईपर्यंत शिजवा.
मूग डाळ शिजल्यावर तुम्ही त्याला जिरे, हिंग आणि लसूण घालून हलकी फोडणी द्या. तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर त्यात फक्त १ थेंब तेल टाका.
मूग डाळीचे पोषण अधिक वाढवण्यासाठी त्यात पालक, दुधी भोपळा, गाजर, टोमॅटो, दोडका यांसारख्या हिरव्यागार भाज्या मिक्स करा.
डाळी पिताना तिच्यासोबत संतुलित आहार घेणे देखील गरजेचे आहे. तुम्ही यासोबत हिरव्या भाज्या, सॅलड आणि गरजेनुसार रोटी, भात खाऊ शकता.
मूग डाळीचे सूप, मुगाचे सॅलॅड , डाळीचे चिला / धिरडे, डाळ खिचडी असे पदार्थ तुम्ही खाऊ शकता. मात्र यात मसाल्यांचे प्रमाण खूपच कमी असणे गरजेचे आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.