Shreya Maskar
रोज कांदे पोहे, उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर, झटपट मुगाच्या डाळीचा डोसा बनवा. हा साऊथमधील प्रसिद्ध नाश्ता आहे. १० मिनिटांत रेसिपी तयार होईल.
मुगाची डाळीचा डोसा बनवण्यासाठी भिजवलेले मूग, तांदूळ, कोथिंबीर, आलं, कढीपत्ता, मीठ, जिरे आणि पाणी इत्यादी साहित्य लागते. तुम्ही यात पोहे देखील टाकू शकता.
मुगाची डाळीचा डोसा बनवण्यासाठी सर्वप्रथम मूग, तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर ४-१० मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. आता मिक्सरच्या भांड्यात तांदूळ आणि डाळ बारीक दळून घ्या.
त्यानंतर मिक्सरमध्ये कोथिंबीर, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, जिरं आणि मीठ घालून बारीक पेस्ट तयार करू घ्या. यात तुम्ही थोडे पाणी देखील टाकू शकता.
तयार मिश्रण बाऊलमध्ये काढू त्यात थोडे पाणी टाकून पेस्ट पातळ करून घ्या. तसेच मिश्रणात चिमूटभर हळद, डाळीचे पीठ आणि बेकिंग सोडा मिक्स करा.
पॅनला तेल लावून तयार डोशाचे बॅटर तव्यावर गोलाकार पसरवा. दोन्ही बाजूंनी डोसा खरपूस फ्राय करा. डोसा फ्राय करताना गॅस मध्यम आचेवर ठेवून द्या.
मुगाच्या डाळीचा डोसा तुम्ही गरमागरम चटणी आणि सांबारसोबत खाऊ शकता.
मुगाची डाळी प्रथिने, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. यामुळे पचन सुधारते, वजन कमी करण्यास मदत करते, हृदयाचे आरोग्य चांगले राहते.