Shreya Maskar
मूग डाळ ढोकळा बनवण्यासाठी मुगाची डाळ, मीठ, हळद, हिंग, बेकिंग सोडा, तेल, मिरची, आले-लसूण पेस्ट इत्यादी साहित्य लागते.
तडका बनवण्यासाठी तेल, मोहरी, जिरे, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता इत्यादी साहित्य लागते.
मूग डाळ ढोकळा बनवण्यासाठी मुगाची डाळ स्वच्छ धुवून रात्रभर भिजवून सकाळी मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
डाळीच्या मिश्रणात हळद, हिंग, मीठ आणि तेल घालून ४-५ मिनिटे चांगले फेटून घ्या.
एका ताटाला तेल लावून तयार केलेले मिश्रण पसरवून घ्या.
कुकरमध्ये २०-२५ मिनिटे ढोकळा वाफवून घ्या.
तडक्यासाठी छोट्या पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकून मिक्स करा.
वाफवलेल्या ढोकळ्याचे तुकडे करून त्यावर तडका, कोथिंबीर आणि ओलं खोबरं टाका.