Shreya Maskar
आलू कटोरी चाट बनवण्यासाठी कॉर्नफ्लोर, मीठ, तेल, दही, उकडलेले चणे, उकडलेले बटाटे, टोमॅटो, चिंचेची चटणी, चाट मसाला, शेव, कोथिंबीर इत्यादी साहित्य लागते.
आलू कटोरी चाट बनवण्यासाठी सर्वप्रथम उकडलेले बटाटे सोलून किसून घ्यावे.
किसलेल्या बटाट्याला मीठ, कॉर्नफ्लोर टाकून चांगले एकजीव करुन घ्या.
एका वाटीत हे मिश्रन टाकूननंतर अलगद तेलात वाटी सोडा म्हणजे मिश्रणाला कटोरीचा आकार येईल.
वाटीतून कटोरी बाहेर काढण्यासाठी तुम्ही चाकूचा वापर करा.
चाट तयार करण्यासाठी बाऊलमध्ये दही, उकडलेले चणे, बटाटे, टोमॅटो, चिंचेची चटणी, शेव, चाट मसाला, कोथिंबीर सर्व पदार्थ मिक्स करा.
तयार मिश्रण कटोर्यांमध्ये चांगले भरा.
यात तुम्ही मक्याचे दाणे, डाळिंबाचे दाणेही टाकू शकता.