Shruti Vilas Kadam
1 कप पिवळी मूग डाळ, 2 हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या), 1 कांदा (बारीक चिरलेला), 1 चमचा आले-लसूण पेस्ट,कोथिंबीरचवीनुसार, मीठ1/2 चमचा, जिरे, तळण्यासाठी तेल
मूग डाळ स्वच्छ धुवून 3 ते 4 तास पाण्यात भिजत ठेवा. त्यामुळे भजी मऊ आणि चविष्ट होतात.
भिजवलेली डाळ पाणी काढून मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. पेस्ट खूप बारीक करू नका.
वाटलेल्या डाळीत कांदा, हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट, जिरे, कोथिंबीर आणि मीठ घालून चांगले मिसळा.
कढईत तेल गरम करा. तेल योग्य तापल्यावर भजी कुरकुरीत होतात.
तयार मिश्रणाचे छोटे गोळे किंवा भजीच्या आकारात तेलात सोडा. सोनेरी रंग येईपर्यंत मध्यम आचेवर तळा.
तयार मूग डाळ भजी हिरवी चटणी, टोमॅटो सॉस किंवा गरम चहासोबत सर्व्ह करा. पावसाळ्यात याची चव आणखी खुलते.