Shreya Maskar
सकाळच्या नाश्त्याला झटपट मुळ्याचा पराठा बनवा.
मुळा पराठा बनवण्यासाठी गव्हाचे पीठ, मीठ, तेल, मुळा , कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, आलं, जिरे इत्यादी साहित्य लागते.
मुळा पराठा बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये गव्हाचे पीठ, मीठ, तेल टाकून कणिक मळून घ्या.
दुसरीकडे मुळा सोलून किसून त्यातील पाणी काढून घ्या.
मुळ्यात हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, जिरे आणि मीठ चांगले मिक्स करा.
कणकेचा गोळ्यात मुळ्याचे सारण भरून छान पोळी लाटून घ्या.
पॅनमध्ये तेल गरम करून तयार पोळी खरपूस भाजून घ्या.
गरमागरम मुळा पराठ्यांचा कोथिंबीरी चटणी आणि सॉससोबत आस्वाद घ्या.